वस्तू आणि सेवा कर परिषदेनं ५६व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कररचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त ५ आणि १८ टक्के अशी दोन स्तरात जी एसटी कर आकारणी होईल. या सुधारणेचं स्वागत व्यापारी तसंच सामान्य नागरिकही करत आहेत.
जीएसटीच्या पुनर्चरनेमुळे अनेक वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत. हाताने विणलेले कपडे आणि भरतकाम केलेल्या शाल यांच्यावरचा कर १२ टक्के होता तो ५ टक्के करण्यात आला आहे. टोप्यांवरचा करही १२ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे. तसंच छत्र्यांवरचा करही १२ वरून ५ टक्के झाला आहे. त्यामुळे या वस्तू ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत. तसंच अडीच हजारांपेक्षा कमी दर असलेल्या पादत्राणांवरच्या करात कपात करून ते पाच टक्के करण्यात आले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा जास्त दर असलेल्या कपड्यांवरचा कर १२ टक्क्यावरून वाढवून १८ टक्के झाला आहे.