न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता. आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला. ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२३ मध्ये तो न्यूजीलंडसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले. २०११ मध्ये होबार्ट कसोटीत त्याने फक्त ६० धावा देऊन ९गडी बाद केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये, ब्रेसवेलने २८ सामन्यांमध्ये ७४ बळी घेतले. तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ४६ गडी बाद केले..