नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मुंबईतल्या विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अग्निसुरक्षा उपकरणं सुस्थितीत आणि कार्यान्वित ठेवावीत, दिशादर्शक फलकांचा समावेश, गॅस जोडण्या आणि विद्युत यंत्रणांची तपासणी, ज्वलनशील साहित्यं टाळणं अशा विविध सूचनांचा त्यात समावेश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्त गर्दी टाळावी, फटाके किंवा इतर आतिषबाजी करू नये, असं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं आहे. 

 

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुद्धची मोहीम कडक केली आहे. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी शहराच्या विविध भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २४२ वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.