October 20, 2025 7:40 PM | Ayodhya

printer

अयोध्येतल्या दीपोत्सवाचा नवा विश्वविक्रम

अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला आणि यावेळी दोन गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले. शरयूतीरावर २६ लाख १७ हजार पणत्या लावण्यात आल्या, तर एकाच वेळी २ हजार १२८ भक्तांनी एकाच वेळी आरती म्हटली. या विश्वविक्रमाचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.