डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या नव्या बसगाड्या धावणार

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी एसटी धावताना दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

 

ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी १७ नव्या गाड्यांचं लोकार्पणही झालं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल असं सरनाईक म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.