न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात हव्या असलेल्या आणखी एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याचं नाव अरुणाचलम मरुथुवर असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध शहरांमध्ये पथकं पाठवली होती, परंतु तो स्वतःच पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला चौकशीसाठी उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलीस अजून दोन आरोपींच्या शोधात आहेत.
Site Admin | March 17, 2025 1:44 PM | New India Co-operative Bank scam
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातला आणखी एक आरोपी अटक
