डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 11, 2025 3:15 PM | US

printer

अमेरिकेत बेकायदेशीर नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा ट्रंप यांचा आदेश न्यूहँपशायरच्या न्यायाधीशांनी रोखून धरला

अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित आणि परदेशी आगंतुक यांनी जन्म दिलेल्या बालकांना नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा आदेश न्यूहँपशायरच्या एका न्यायाधीशांनी रोखून धरला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अमेरिकेत जन्मलेल्या सर्व बाळांना नागरिकत्वाची हमी दिलेली आहे.

 

परंतु स्थलांतरितांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं ट्रंप यांनी हा अधिकार काढून घेणारा आदेश जारी केला होता. ट्रंप यांचा आदेश हानीकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं. स्थलांतरित पालक आणि त्यांच्या बालकांच्या वतीने अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

 

दरम्यान, व्हाईट हाऊसने न्यायाधीशांच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिले असून, ट्रम्प प्रशासन, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ज्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी निवडून आले, त्या धोरणांना विरोध करणाऱ्या जिल्हा न्यायाधीशांविरुद्ध जोमाने लढा देईल असं प्रवक्ते हॅरिसन फील्ड्स यांनी काल एका निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा