डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धुळे जिल्ह्यातल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू

धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर ते नरडाणा या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे. तसंच नव्या धुळे रेल्वेस्थानकाच्या कामालाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी दिली. धुळे ते नरडाणा दरम्यान सहा रेल्वेस्थानकं असतील. यात बोरविहीर, न्यू धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा या स्थानकांचा समावेश आहे.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी टप्प्याटप्प्याने भूसंपादन करण्यात येणार आहे. २०२९ पर्यंत या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.