डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवी दिल्लीत कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक

देशभरातल्या कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि २०४७ मधील विकसित भारत अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. परिषदेत कृषी क्षेत्रातले प्रमुख धोरणकर्ते, विचारवंत आणि शैक्षणिक तज्ञ एकत्र येतील आणि देशभरातील शेती क्षेत्रात नवसंकल्पना राबवून नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती कृषी मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.