डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधे नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. त्यांच्याशिवाय इतर उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शहा यांनी याआधी उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि गुजरातमधे फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता.