September 2, 2024 8:11 PM | IC814OnNetflix

printer

नेटफ्लिक्सच्या ‘आयसी – ८१४ – द कंदाहार हायजॅक’ या नव्या वेबसिरीजवरून वाद

नेटफ्लिक्स या ओटीटी मंचावरच्या आयसी-८१४ – द कंदाहार हायजॅक या वेबसीरीजवरून झालेल्या वादंगाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेटफ्लिक्सच्या आशयनिर्मिती प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. आशयनिर्मिती प्रमुख स्वतः उद्या मंत्रालयासमोर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या वेबसीरीजमधल्या काही पात्रांच्या चित्रणावर आक्षेप घेण्यात आला आहे.