डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 17, 2025 1:34 PM | Benjamin Netanyahu

printer

इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविराम लागू झाल्याची नेतान्याहू यांची घोषणा

कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातल्या वाटाघाटीनंतर गाझामध्ये ओलिस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी आणि युद्धविराम लागू करण्यासाठी करार झाला असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी आज जाहीर केलं.

 

नेतन्याहू यांनी करारावर मतदान घेण्यासाठी आज सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती, त्यात या कराराला मान्यता देण्यात आली. हा करार यशस्वीरित्या पार पडल्या बद्दल नेतान्याहू यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. इस्रायल आणि हमासमध्ये गेली 15 महिने संघर्ष सुरू होता त्यामुळे या करारानंतर ओलीसांची सुटका होणार आहे. म्हणून या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.