नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांचा राजीनामा

नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधानमंत्री सुशिला कार्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यावर घिसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन यापुढचा आपला राजकीय प्रवास सुरूच राहील असं स्पष्ट केलं. घिसिंग यांनी ११५ दिवस ऊर्जा, जलसंपदा आणि सिंचन मंत्रालयाचा कारभार सांभाळला. ५ मार्चला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या नेत्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं प्रधानमंत्री सुशिला कार्की यांनी सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर घिसिंग यांच्या राजीनाम्याकडे पाहिलं जात आहे.