December 12, 2025 10:55 AM

printer

नेपाळमध्ये काठमांडू इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 कलमी करार

नेपाळमध्ये काठमांडू इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार आणि जेन झेड प्रतिनिधींच्या दरम्यान 10 कलमी कराराला मान्यता देण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

प्रधानमंत्री कार्यालयातील सिंह दरबारात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. जेन झेड चळवळीदरम्यान मृत आणि जखमी झालेल्यांच्यावतीनं प्रधानमंत्री सुशीला कार्की आणि भोज बिक्रम थापा यांनी या करारावर स्वाक्षरी केली.