नेपाळच्या प्रधानमंत्री सुशिला कार्की यांनी हंगामी सरकारसाठी पाच नव्या मंत्र्यांच्या नावाची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधी न्यायमूर्ती अनिल कुमार सिन्हा यांना उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालय, तसंच कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाबीर पुन यांची शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मदत प्रसाद पेरियार हे कृषीमंत्री असतील तर जगदीश खरेल हे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री असतील. याआधी हंगामी सरकारमधे रामेश्वर खनाल अर्थमंत्री, कुलमान घुसिंग ऊर्जामंत्री आणि ओमप्रकाश आर्याल गृहमंत्री आहेत.
Site Admin | September 22, 2025 12:34 PM | Nepal Government
Nepal: हंगामी सरकारसाठी पाच नव्या मंत्र्यांच्या नावाची शिफारस