नेपाळ बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह जळगावात दाखल

नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.