नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे तिथं अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगोनं दिल्ली ते काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. नियोजित उड्डाणे सुरू झाली आहेत आणि आजपासून पुन्हा सुरू होतील असं सांगून एयर इंडियानं प्रवाशांना त्यांच्या संकेतस्थळावर उड्डाणांची स्थिती तपासण्यास सांगितलं आहे.
इंडिगोद्वारे काठमांडूसाठी दररोज चार उड्डाणं पुन्हा सुरू होतील. प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समर्पित दोन विशेष मदत उड्डाणे देखील चालवली जातील असं कंपनीनं काल एका निवेदनात सांगितलं. दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी विमान कंपन्यांना प्रवासी तिकीटाची किंमत वाजवी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.