डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2025 8:39 PM

printer

नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन सत्तांतरच्या हालचालींना वेग

नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन सत्तांतरच्या हालचालींना वेग आला आहे. नवं सरकार स्थापन करण्यासाठी अनेक नावं समोर येत आहेत. काठमांडू इथं आज सकाळी झालेल्या युवा प्रतिनिधींच्या बैठकीत अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. मात्र या नावाला अनेकांनी विरोध दर्शवत जोरदार निदर्शनं केली. काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. विद्यमान संसद विसर्जित केल्याशिवाय सरकारमध्ये सहभागी व्हायला त्यांनी नकार दिल्याचं वृत्त आहे. धरान शहराचे महापौर हरक राज सपांग राय, दुर्गा परसाई यांनीही लष्कर प्रमुखांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. पण देशातल्या सद्यस्थितीची चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असं ते म्हणाले.