डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नीट युजी पेपर फुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश

पेपर फुटीची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असेल तरच फेरपरीक्षेचा विचार केला जाईल, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. नीट युजी पेपर फुटीच्या प्रकरणासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिला आहे. हे दोन्ही अहवाल बुधवारी संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह एकूण ३८ याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षा घेणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणावरची पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.