डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत चालू असून याप्रकरणी न्यायलयात सुनावणी सुरु आहे. असं ते म्हणाले. देशभरात ४हजार ७०० केंद्रांवर नीट युजी परीक्षा घेण्यात आली. त्यातल्या एका केंद्रावरच अनियमतता झाल्याची नोंद आहे, असं एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी देशात स्पर्धापरीक्षा यंत्रणेबद्दलचा मुद्दा उपस्थित केला.  

राज्यसभेत आज इतर कामकाज बाजूला ठेवून कावड यात्रेसंबंधी उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी ती नाकारली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.