August 27, 2024 8:50 AM | Aaditya Thackray

printer

लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज – आदित्य ठाकरे

लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.