डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 5, 2025 8:16 PM | delhi assembly

printer

दिल्ली विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत आणि मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय, भाजपचे विजेंदर गुप्ता, परवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि कैलाश गहलोत हे निवडणूक रिंगणात आहेत.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधिश संजीव खन्ना, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार, प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा, दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी देखील सकाळी मतदान केलं आहे. तामिळनाडूमधल्या इरोड पूर्व आणि उत्तर प्रदेशातल्या मिल्कीपूरमध्येही आज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं.