प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या दलातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची तत्परता, व्यावसायिकता आणि दृढनिश्चयाबद्दल देश नेहमीच त्यांचा ऋणी राहील असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापनादिवसाबद्दल समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या असून दलात सेवा बजावताना हुतात्मा झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे.
Site Admin | January 19, 2026 1:34 PM | NDRF Raising Day
NDRF च्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा