August 5, 2025 11:04 AM | NDA Meeting

printer

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या संसदीय मंडळाची आज सकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. बिहारमध्ये मतदारयाद्या पुनरीक्षण मागं घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली असून, त्याबाबत चर्चा घेण्यासाठी ते संसदेत गोंधळ करत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएनं ही बैठक आयोजित केली आहे.

 

विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी सुधारणा विधेयक 2025 लोकसभेत चर्चेसाठी येऊ शकलेलं नाही. विरोधी पक्षांनी सभागृहाचा वेळ वाया घालवू नये असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे आणि त्यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. ही विधेयकं महत्त्वाची असून विरोधी पक्षांनी चर्चा होऊ द्यावी, असं आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.