December 9, 2025 3:48 PM

printer

एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत झाली

राष्ट्रीय लोकशाही आघाडी – एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीच्या संसद भवन संकुलात झाली.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा,  तसंच रालोआचे सर्व खासदार  बैठकीला उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन बैठकीत करण्यात आलं. 

 

देशाच्या विकासाकरता अधिक जोमाने काम करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी सर्व खासदारांना केलं. सर्वसामान्य माणसाचं जीवन सुलभ आणि सुखकर बनवण्यासाठी सर्व क्षेत्रात चौफेर सुधारणांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.