‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधे राष्ट्रवादी काँग्रेस ८५ ते ९० जागा मागणार’

आगामी विधानसभा निवडणुकीत ८५ ते ९० जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे. महायुतीमधे तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीत NDA ला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले.

 

राज्यात लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळेल, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.