राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची आपली तयारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मांडली.
तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यांचे समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. महायुतीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.