डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 24, 2024 6:54 PM | Sharad Pawar

printer

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा शरद पवार यांचा निर्धार

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहू, नव्या पिढीला उभं करणं हा आपला कार्यक्रम राहील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आज सातारा जिल्ह्यात कराड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.

 

महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं पवार म्हणाले. ओबीसी मतदार महाविकास आघाडीच्या विरोधात गेले का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात झाली. त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याविरोधात जातील हे मनाला पटत नाही. लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असंही पवार यांनी सांगितलं.