राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विविध मुद्द्यांवर पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि इतर सदस्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या विषयांवर समित्यांच्या माध्यमातून मागील वाटचाल आणि आगामी कार्यपद्धती यावर ठोस धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार आहे. सरकार आणि पक्षातला समन्वय परिणामकारक करणे, जनतेशी संवाद साधण्याची धोरणे यासारख्या मुद्द्यांवर या नागपुरातल्या चिंतन शिबिरात चर्चा झाल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.
Site Admin | September 19, 2025 6:40 PM | NCP
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मुद्द्यांवर समित्या स्थापन