राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा आणि राष्ट्रीय विकास तसंच राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात विविध कार्यक्रमांत एनसीसीचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सुरक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांनी ७८ व्या राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्तानं नवी दिल्लीत राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ही माहिती दिली. देशाच्या प्रगतीत युवा पिढीची प्रमुख भूमिका आहे. युवा पिढीची शक्ती आणि क्षमता यांचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना असल्याचंही त्यांनी सांगितलं.
देशातल्या ७०० हून अधिक जिल्ह्यांत NCC चा विस्तार झाल्याचं राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विरेंद्र वत्स यांनी सांगितलं. NCC मध्ये ४० टक्के कॅडेट्स महिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 22, 2025 3:54 PM | NCC students
राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार