नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल उद्या गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त आहे. त्याच्यावर विविध राज्यात १० कोटी रुपयांचं बक्षीस आहे. त्याच्यासोबत ६० नक्षलवादी सुद्धा आत्मसमर्पण करतील. यामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र या आत्मसमर्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी ‘शस्र उचलणं ही चूक होती, ‘जनतेची माफी मागून शांततेचा मार्ग स्विकारणं गरजेचं आहे’ या आशयाचं पत्र भूपतीनं लिहिलं होतं. इतर नक्षलवादी नेत्यांनी या भूमिकेला विरोध केला होता.
Site Admin | October 14, 2025 7:34 PM
जहाल नक्षलवादी भूपती गडचिरोलीत आत्मसमर्पण करणार
