देशातल्या नक्षलवादाचा अतिप्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या ३ पर्यंत कमी झाली आहे. तर एकूण नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या १८ वरुन ११ पर्यंत घसरली आहे, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.
सध्या छत्तीसगडमधल्या बिजापूर, छत्तीसगड आणि नारायणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. २०१३ मध्ये देशातल्या १२६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. यंदाच्या मार्चमध्ये ही संख्या १८ पर्यंत आणि आता ११ पर्यंत कमी झाली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यंदाच्या वर्षात सीपीआय माओवादी पक्षाचा सरचिटणीस, पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे ८ सदस्य यांच्यासह ३१२ नक्षलवादी विविध ठिकाणी चकमकीत मारले गेले. ८३६ जणांना अटक झाली आणि सोळाशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यामुळं गेल्या अनेकवर्षातले विक्रम मोडीत निघाले आहेत.