October 28, 2025 8:16 PM | Naxal Surrender

printer

नक्षलवादी बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांचं आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांचे दोन मोठे नेते बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांनी आज तेलंगणा पोलिसांसमोर हैदराबाद इथं शरणागती पत्करली.  प्रकाश हा मंचेरियल जिल्ह्यातल्या रहिवासी असून शाळकरी वयातच तो नक्षलवादी चळवळीशी जोडला गेला होता. प्रसाद राव हा गेल्या सतरा वर्षांपासून केंद्रीय समितीचा सदस्य असून नक्षलवादी चळवळीशी गेल्या चाळीस वर्षांपासून जोडलेला होता. जहाल नक्षलवादी नेता किशनजी याच्या नेतृत्वाखाली त्याने चळवळीत काम केलं आहे.

 

आरोग्याच्या समस्यांमुळे प्रसाद रावनं शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. तेलंगणामधे अजूनही ६४ नक्षलवादी कार्यरत असून शरण येणाऱ्यांना सरकार मदत करेल, असं पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी  यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.