कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीमच्या टोळीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरुद्ध पीएमएलए न्यायालयाने आज आरोप निश्चित केले. मुंबईत कुर्ला इथल्या गोवावाला कंपाऊंडमधल्या ३ एकर जागेचा ताब अवैधपणे घेतल्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवला आहे. या प्रकरणी ईडीने केवळ तर्काच्या आधारे आपल्यावर आरोप ठेवले असून त्यातून मुक्त करावं अशी मागणी करणारा नवाब मलिक यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, तिचा हस्तक सलीम पटेल, आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी सरदार खान हे या प्रकरणातले मुख्य आरोपी असून त्यांनी या जागेचा ताबा बळजबरीने घेऊन नंतर मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे.