नौदलाच्या मोठ्या टेहेळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज इक्षक हे उद्या कार्यान्वित होणार आहे. कोची इथं समारंभपूर्वक या जहाजाचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन हे जहाज नौदलाच्या दक्षिण कमांडमधे तैनात होणार आहे.
कोलकाता इथल्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर झाला आहे.
बंदरं, जहाजांचे तळ आणि खोल समुद्रातल्या नौवहन मार्गांच्या टेहळणीसाठी हे जहाज उपयुक्त ठरेल. यादृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक उपकरणं, स्वनियंत्रित पाणबुडी, रिमोट आधारीत नौका, सर्वेक्षणासाठीच्या मोटार बोटी अशा सुविधांनी सज्ज आहे. यासोबतच जहाजावर हेलिकॉप्टर डेकची सोयही उपलब्ध आहे.