प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांची चंदीगढ च्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राला भेट

प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी काल चंदीगढ च्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राला भेट दिली. दोन्ही ठिकाणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सेहगल यांनी माध्यम संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेला चालना देण्याचा संदेश सेहगल यांनी यावेळी दिला. आकाशवाणीला अधिक प्रभावी आणि लवचिक संस्था बनवण्याच्या गरजेवर त्यांनी यावेळी भर दिला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.