डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधिक्षक

बीडच्या पोलीस अधिक्षक पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त असुन त्यांची एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती.

त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे. कावत मुळचे राजस्थानचे असुन २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी यापुर्वी धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.