मुंबईतही वरळी इथे ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. नवकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच जैन समाजाचे प्रतिनिधी, जैन साधु, साध्वी आणि मान्यवर उपस्थित होते.
जळगावात 81 हजार जणांनी एकाच वेळी सामुदायिक नवकार महामंत्राचा जप केला. यात महिला-पुरूष ,युवक-युवती आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.