नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचं काम उद्या होणार आहे. त्यासाठी उद्या दुपारी १२ वाजल्यापासून ते १५ मे रोजी दुपारी १२पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमध्ये या काळात पाणी पुरवठा होणार नाही तसंच गुरुवारी १५ मे रोजी संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.