नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी आठ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे . येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. विमानतळाला ३० सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे.
Site Admin | October 6, 2025 1:48 PM
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार
