नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या नऊ विमानतळांवर विमान प्रवास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तासापुरती विमानसेवा सुरू राहील.