नवी मुंबईतल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर पडलं आहे. अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज या विमानतळाच्या बांधकामाला भेट दिली आणि येत्या जूनमधे त्याचं उद्घाटन होईल असं समाजमाध्यमावर लिहीलं आहे. या आधी येत्या १७ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल, असं अदानी समूहातर्फे सांगण्यात आलं होतं. अदानी उद्योगसमूह आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या या विमानतळाची क्षमता एका वर्षात ९ कोटी प्रवाशांची ये-जा हाताळण्याची असेल.
Site Admin | March 16, 2025 7:28 PM | Navi Mumbai Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर
