हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने थायलंडच्या पीरातचाई सुकफुन आणि पाक्कापोन तिरारत्साकुल यांना हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भारतीय जोडीने थायलंडच्या जोडीचा १८-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. उद्या या जोडीचा सामना मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप यांच्याशी होईल.