दिल्लीत काल द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषद 2025 ची पहिली आवृत्ती काल पार पडली. सागरी क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांवर आणि भारतीय नौदलाच्या परिचालन तयारीचा आढावा यांवर दोन टप्प्यात चर्चा झाली.
कारवार इथं झालेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्राचं अध्यक्षपद संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवलं यामध्ये संरक्षण प्रमुख, संरक्षण सचिव, संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि नौदल कमांडर्स सहभागी झाले होते. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी आयओएस सागर नौकेला हिरवा झेंडा दाखवला.
त्याशिवाय सीबर्ड प्रकल्पाचा भाग असलेले जहाजे उभी करण्यासाठीचे नऊ अत्याधुनिक सागरी धक्के, आठ निवासी इमारती आणि अनेक महत्त्वाच्या उपयुक्त उपकरणांचे उद्घाटन देखील केले.