वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांच्या माध्यमातून होणाऱ्या दृष्टिकोन बदलासाठी नाट्यमहोत्सवाची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबईत ते काल बोलत होते.
या महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. यावेळी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, शशी प्रभू यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. २० फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत हा नाट्य महोत्सव यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी रंगणार आहे. या विशेष नाट्य महोत्सवात बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण होणार आहे