विराेधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण – आमदार जितेंद्र आव्हाड

विराेधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शनिवारी ठाण्यात सभेपूर्वी शिवसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर मनसेच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावं असं ते म्हणाले. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही, असा इशाराही आव्हाड यांनी यावेळी दिला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.