डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. माणमधून प्रभागर घार्गे, काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दौंडमधून रमेश थोरात, वाईतून अरुणादेवी पिसाळ, पुसदमधून शरद मैंद, तर सिंदखेडा इथून संदीप बेडसे निवडणुकीच्या रिंगणात असतील.