डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार

महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.  यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.