राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह बाद!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रंपेट हे चिन्ह निवडणूक आयोगाने यादीतून बाद केलं आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलेलं होतं. अनेक अपक्षांनी त्यावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यावर ट्रंपेट चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा पक्षाने केला होता. आता निवडणूक आयोगाने हे चिन्ह यादीतून हटवलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.