डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय जलपुरस्कारांमधे महाराष्ट्राला विविध विभागात मिळून ५ पुरस्कार

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमधल्या उत्कृष्ट महानगरपालिका श्रेणीत पुणे महानगर पालिकेला तिसरा क्रमांक जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण करतील. उत्कृष्ट राज्यांच्या श्रेणीत ओडिशा प्रथम, उत्तर प्रदेश द्वितीय तर गुजरात आणि  पुद्दुचेरीला संयुक्तरित्या तिसरा पुरस्कार मिळाला आहे. 

 

सिव्हील सोसायटी श्रेणीत पुण्यातल्या बायफ विकास संशोधन फाऊंडेशनला पहिला आणि नाशिकच्या युवा मित्रला दुसरा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाणी वापर संघटनेच्या श्रेणीत बुलडाणा जिल्ह्यातल्या पेंटाकली प्रकल्प संघटनेला पहिला पुरस्कार तर उद्योग श्रेणीत यवतमाळच्या रेमंड युको डेनिम कंपनीला तिसरा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.